बघता बघता २०१२ संपलं आणि २०१३ चा सूर्य उगवलाही.. वर्ष सुरू आहे असं म्हणत असतानाच ते कधी इतिहासजमा झालं, ते कळलंही नाही. खूप चढ-उतार दाखवत २०१२ गेलं. वर्षभराच्या प्रवासात अनेक नवीन माणसं देऊन गेलं. आतापर्यंत जमविलेल्या अनुभवांच्या शिदोरीत त्यांच्या येण्यानं वेगळीच भर टाकत गेलं. ज्यामुळे शिदोरी जास्त प्रगल्भ झाली, समजूतदार झाली.
या सगळ्यात खूप महत्त्वाचं म्हणजे कितीही नवीन वर्ष येत राहिली तरी नव्याचं स्वागत करताना जुन्याचा विसर मात्र, कधीच पडत नाही.. पडला नाही.. आणि पडणारही नाही. माळ्यावरच्या जुन्या गाठोड्यात वर्षानुवर्षे जपून ठेवलेल्या चिंध्या असोत किंवा अडगळ म्हणून वाटणाऱ्या वस्तू असोत. कधीतरी त्यांच्याकडे पाहिलं की त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या अनेक आठवणी क्षणात डोळ्यासमोरून झरकन उडून जातात आणि मनाला काही काळ तरी आनंद देऊन जातात. सोनेरी आठवणीत रमवून जातात. अगदी तसंच या सरलेल्या वर्षांचंही असतं. कितीही वर्षं पुढे जात राहिलो, तरी प्रत्येक वर्षी घडलेल्या काही ना काही गोष्टी सतत समोर येत राहतात. काही त्रासदायक ठरतात आणि काही खूप निखळ आनंद देत राहतात. अशा आनंद देणाऱ्याच गोष्टी आयुष्य जगण्याचा उत्साह वाढवतात आणि प्रत्येक दिवस नवा भासवतात.
लहानपणी का कोण जाणे वर्ष म्हणजे ३६५ दिवस हे खूप मोठ्ठे वाटतात. सरता सरत नाहीत. अभ्यास, शाळा, क्लास, अॅक्टिव्हिटी, आई-बाबांचं रागावणं, शिक्षक... या सगळ्यातून लवकर सुटका हवी असते आणि दिवस मात्र हळू हळू सरकत असतो. आणि आता प्रत्येक क्षण खूप खूप जगावासा वाटतो. पण दिवस सुरू झाला म्हणेपर्यंत तो संपलेला असतो. येणाऱ्या प्रत्येक दिवशी नवीन काही तरी अनुभवायचं असतं, नव्या आव्हानांना सामोरं जायचं असतं, भेटणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं करायचं असतं, त्याला जाणून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं, आपल्यातलं काही द्यायचं असतं आणि काही घ्यायचं असतं.. पण हे खूप काही करतानाच आयुष्य इतकं थिटं वाटायला लागतं.. वर्ष सरतंय म्हणजे आपल्या आयुष्यातून ते वजा होतंया याची प्रकर्षाने जाणीव होत राहते. जो आनंद लहानपणात घ्यायचा होता, असं वाटतं तो आता का नाही मिळतं... कामाचे ताण, नात्यातले ताण, रुसवे-फुगवे, मत्सर, राग, लोभ या सगळ्या भावना मनाला आता त्रासदायक वाटू लागतात. या सगळ्यातलं जेव्हा काहीच कळत नव्हतं तेव्हाच आयुष्य खूप सुंदर होतं. आणि आता सगळ समजतंय तर अशा भावनांचा तितकाच त्रासही होतोय.
वाढत्या वयाचा सफर कितीही सुहाना वाटला तरी कागज की कश्ती, बारिश का पानी.. आणि बचपन का सावन पुन्हा कधीच अनुभवता येणार नाही, याचं दुःखं खूप मोठं आहे. फिरभी जिंदगी हसीं है.. असं म्हणत आता २०१३ चा प्रत्येक दिवस मनावर कोरायचा.. टिपकागदासारखं आयुष्य करायचं.. सतत नवीन काही शिकत राहायचं.. प्रत्येकाला आनंदी ठेवायचं.. आणि कोणाबद्दल किंचितही मनात राग, रुसवा न ठेवता प्रत्येक दिवस खूप आनंदात आणि समाधानात घालवायचा हे ठरवलंय कारण, उद्याचा दिवस काय घेऊन येतोय हे कोणी पाहिलंय त्यामुळे हे पूर्वीच केलं असतं तर बरं झालं असतं.. असं कदापि वाटून घ्यायचं नाही. सुंदर, निरव आणि लखलखता दिवस आपणच निर्माण करायचा. मनात ज्या वेळी जे जेईल, ते करायचं आणि प्रत्येक दिवसावर आपलं म्हणून काही तरी कोरून ठेवायचं..
सीमा शेख
एक जानेवारी २०१३
सकाळी ९.१३

No comments:
Post a Comment