मी स्वयंपाक घरात.. आणि हाॅलमधून जोरात लेकीची हाक आली.. आई गंदबाबी बाप्पा.. गंदबाबी बाप्पा.. सुरवातीला काहीच समजलं नाही. तिच्या अडीच वर्षाच्या बोबड्या बोलातून ती खूप काही तरी आनंदून सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण मला ते समजत नव्हतं. शेवटी. हातातलं काम सोडून मी हाॅलमध्येच थांबले. तिला जवळ घेऊन दोन - तीन वेळा विचारलं.. तू काय म्हणतेस.. पुन्हा सांग.. वगैरे.. तिच्या ओठांच्या हालचालींवरून मी त्या गंदबाबी या शब्दाचा शोध घ्यायला लागले. पण काही केल्या संदर्भ लागेना.
इतक्यात झी मराठीवर चॅनेलचं प्रमोशनल साँग लागलं. पावसातून गणपती बाप्पांची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घरी आणतानाचं एक दृश्य त्यात आहे. ते पाहून ही पुन्हा जोरात म्हणाली.. आई गंदबाबी बाप्पा... तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.. गंदबाबी बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. आणि मगाचपासून तिला हेच सांगायचं होतं. सध्या चौकाचौकाच मंडळांची गणेशोत्सवाची पोस्टर्स लागलेली दिसतायत. शिवाय बऱ्याच लहानपणापासून गणपती बाप्पा ओळखता येतो पण आता म्हणता येतो तो सुद्धा असा.. गंदबाबी बाप्पा.. हे माझ्यासाठी नवीनच होतं. आतापर्यंत लहान मुलं गम्पती बाप्पा मोलया.. असं म्हणतात, हे माहीत होतं. पण आमच्या घरात गम्पती ऐवजी गंदबाबी बाप्पा आलेत, याचा आनंद आहे. या तिने अर्धवट ऐकलेल्या किंवा नीट ऐकलेल्या पण तिला उच्चारता न आल्याने बोबड्या बनणाऱ्या शब्दांची आता खूप गंमत वाटते. तिच्या अशा अनेक बोबड्या शब्दांची आता यादी करून ठेवाविशी वाटतेय.
सीमा सलीम देसाई