आज सकाळी पेपर उघडला, एक बातमी वाचायला मिळाली.. आणि त्या बातमीशी संबंधितांची खरोखर कीव कराविशी वाटली. माया कॅलेंडरनुसार २१ डिसेंबर २०१२ रोजी जगबुडी होणार म्हणून दिवसभर जप, होम, meditation करण्याचे आवाहन त्यामध्ये होते. गेले काही दिवस facebook वर पण या विषयाची चर्चा सुरु होती.. जगबुडी होण्याच्या घटनेचा लोक इतके बाऊ का करतात हेच समजत नाही. जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधी या जगातून जाणार आहे, हे माहित असताना या अटळ सत्याला का लोक सामोरे जाऊ शकत नाहीत ?
का लोक मरणाला घाबरतात ? या जगबुडीवर माझे उत्तर एकच कि, जेव्हा आपल्याला मरण येईल तेव्हाच हे जग संपेल. याचा तर्क अगदी सोप्पा आहे. माणसाला मरण आल्यावर काही समजतं का ? नाही !! त्यामुळे फक्त तेव्हाच आपल्या भोवतालचे जग संपलेले असेल, तोपर्यंत ही जीवसृष्टी कायम राहणार आहे. जी गोष्ट भविष्यात कधीतरी घडणार आहे, त्याची काळजी आज कशाला करायची ? माणूस चित्रपटातील एका गाण्यात जसे म्हटले आहे,. `आता कशाला उद्याची बात.. बघ उडून चालली रात..` आणि नाहीतरी हे काव्य अगदी खरच आहे की.. आजचा दिवस आपला आहे, असे समजूनच या आयुष्याकडे पहिले तर त्याच्या सौंदर्याचा आनंद घेत येईल. सतत तक्रारी करणं, नाराज होणं यामुळे जगण्यातला आनंद कमी होतो असं वाटतं. कोणताच दिवस सुकर, निवांत आणि लक्षणीय नसतो, तो कसा बनवायचा हे मात्र आपल्या हातात नेहमीच असते.
दो पल रुका ख्वाबोका कारवा .. और फिर चाल दिये तुम कहा हम कहा ...
दो पल की थी ये दिलोकी दास्ता... और फिर चाल दिये तुम कहा हम कहा ...
सीमा शेख
२१ डिसेंबर, २०१२
सायं. ७.३०

No comments:
Post a Comment