अखेर साधारण अर्धा ते पाऊण तासाचं ऑपरेशन झालं. मला अॅनेस्थेशिया देताना, त्याचा माझ्यावर परिणाम होताना आणि ऑपरेशननंतर त्यातून मी बाहेर येताना डॉक्टर आणि आसपासच्या व्यक्तींचं बोलणं, माझ्याशी झालेला संवाद... अजूनही पुसटसं आठवतंय. यात एक मजेशीर गोष्ट म्हणजे माझ्या मनगटात ज्या क्लिप लावल्या जातील, असं मला ऑपरेशनपूर्वी सांगण्यात आलं, त्या नक्की लावल्या की नाही, हे देखील मी ओ.टी.मधून बाहेर येण्यापूर्वी डॉक्टरना विचारल्याचं आठवतंय. हे विचारणं म्हणजे त्या डॉक्टरचीच परीक्षा घेण्यासारखं किंवा उलटतपासणी करण्यासारखं होतं, हे तेव्हा जाणवलं नाही. ऑपरेशन झाल्यानंतर मला काही तास झोप लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं..आणि त्या क्षणापासून रात्रभर झोपच लागली नाही. त्यानंतर जागून काढलेल्या अनेक रात्री गेल्या.
या हॉस्पिटलचं एक वैशिष्ट्य असं वाटलं की तिथं व्हिजिटर्सना वेळेची मर्यादा नसावी. कारण दिवसभर कोणीही मला भेटायला येऊ शकत होतं. मुख्य म्हणजे ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी माझ्या दहा ते बारा मैत्रिणी मला भेटायला आल्या. नुकत्याच स्थापन झालेल्या आमच्या महिला पत्रकार संघामुळे ही संख्याही वाढली होती आणि संघाच्या स्थापनेनंतर दोनच महिन्यात माझा अॅक्सिडेंटचा पराक्रम झाल्यामुळे पुढचे चार महिने आमच्या संघात काहीच अॅक्टिव्हिटी होऊ शकली नाही. २९, ३० आणि ३१ जुलै हे तीन दिवस म्हणजे अगदी वेळापत्रक ठरवून दिल्यासारखं झालं होतं. सकाळी राउंडला येणारे डॉक्टर (फक्त डॉक्टर नाही, सोबत त्यांचा ताफासुद्धा), ठराविक वेळानंतर औषधाचा रिमाइंडर, सतत सलाइन बदलणाऱ्या नर्स आणि अतिशय बोअर करणारी ती डिलक्स रूम. या सगळ्यामध्ये ड्रेसिंगची दहा मिनिटं मला नको वाटायची. मला सांगितल्यानुसार साधारण ३१ जुलैला मला डिस्चार्ज मिळणं अपेक्षित होतं. डॉक्टरांची राउंडची सकाळी दहाची वेळ ठरलेली. `आज तुम्ही घरी जाऊ शकता`.. हे शब्द ऐकण्यासाठी आम्ही सगळेच त्यांची वाट पहात होतो. मी अक्षरशः बेडवरून उठून येरझाऱ्या घालत होते. एकाच जागेवर तास अन तास बसणं नको वाटत होतं. इतक्यात माझ्या रूमच्या दरवाज्यावर नॉक झालं.. डॉक्टर राउंडसाठी आलेले. मला अस्वस्थपणे चालताना पाहून त्यांनी विचारलं, काय घरी जायची तयारी का.. आणि मला खूप आनंद झाला. मी म्हटलं, तुमच्याच परवानगीची वाट पाहतोय. पुढच्याच दहा मिनिटात मला तपासल्यावर अखेर परवानगी मिळाली.
डिस्चार्ज मिळून घरी आल्यानंतर प्रत्येक मंगळवार ड्रेसिंगसाठी ठरलेला. ड्रेसिंगचा पहिला दिवस. पावसाचे दिवस. संध्याकाळची वेळ.. एक हात गळ्यात बांधलेला.. एकूणच खूप कठीण होतं सगळं. पण हळूहळू या सगळ्याचीही सवय झाली होती. या सगळ्यात एक गंमत म्हणजे, पहिल्या ड्रेसिंगसाठी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनवर गेल्यावर लक्षात आलं, माझं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरचं नावंच मला माहीत नव्हतं. मी एक क्षणभर ब्लँक. मग फाइलमधले पेपर्स पाहिल्यावर समजलं, डॉ. दर्पण महेशगौरी. मी विचारलं, डॉ. महेशगौरी आहेत का..? रिसेप्शनवरचं उत्तर... डॉ. महेशगौरी ?.. सॉरी, नाव पुन्हा सांगा. आमच्याकडे हे डॉक्टर येत नाहीत. मला वाटलंच, एक तर माझं वाचायला चुकलं बहुतेक. इतक्यात रिसेप्शनच्या उजव्या बाजूला लावलेल्या सगळ्या डॉक्टरांची नावं दिसली. त्यात एकच नाव भलं मोठं.. त्या बोर्डवर न मावणारं म्हणूनच काहीसं तुलनेनं लहान अक्षरात लिहिलेलं दिसलं. मग मी रिसेप्शनिस्टला पूर्ण नाव सांगितलं. तेव्हा त्यांना उलगडा झाला. म्हणाली, ओके.. डॉ. दर्पण सरांबद्दल बोलताय तुम्ही.. ते आहेत ना...थांबा..
असा प्रवास सुरू झाला.. दुखणं सहन करण्याचा आणि स्वतःची क्षमता वाढवण्याचा. असे अनेक दिवस गेले. हातावरच्या पट्ट्यांनी रंग बदलले. पांढऱ्या पट्ट्या, निळं प्लॅस्टर, क्रीम कलरचं क्रेप बँडेज..असे बरेच काही. याच काही दिवसांत सुनील आणि राजेशनं घरी आणलेल्या काजूकतलीने माझ्या बोअरिंग दिवसात रंग भरल्यासारखं वाटलं. हातातल्या क्लिप काढण्याच्या दिवशी अक्षरशः हॉस्पिटलमध्ये जावंसं वाटत नव्हतं. थोडी भीती होती. पण पर्याय नव्हता. तो दिवसही पार पडला आणि मग फिजिओथेरपीचे सर्वांत कठीण दिवस. आतापर्यंत नव्हतं इतकं दुखणं या काळात सहन करावं लागलं.
दरम्यान, घरी रिकाम्या वेळात डाव्या हातानं लिहायला सुरवात केली होती. मोबाईल, एसएमएस तर डाव्या हाताने अगदी सहज जमत होते. पंधरा दिवसांच्या सुटीनंतर ऑफिस जॉइन केलं. फक्त फिल्डवरच्या असाइनमेंट्स करत नव्हते. पण डाव्या हातानं टायपिंग, फोनवरच इंटरव्ह्यू रेकॉर्ड करणे आणि नंतर ऐकून बातमी लिहिणे, रोजच्या कामाबरोबर कित्येक पुरवण्यांचे लेख असं काम भरपूर सुरू होतं. तसं म्हटलं तर घडलेली घटना फार काही चांगली नव्हती. पण यामुळे खूप माणसं जवळ आली. आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहण्याची दृष्टी मिळाली. सगळं धडधाकट असताना, सुस्थितीत असताना कोणीही आयुष्य जगतं. पण एखादा अवयव निकामी झाला, तरी या जगण्यावर आणि या जन्मावर कसं लक्ष लक्ष प्रेम करायचं हे या दिवसांनी मला शिकवलं. या काळात फिजिओथेरपीला दिसणारे पेशंट पाहिल्यावर माझं दुखणं तर मी पूर्णपणे विसरून जात. इतर इतकी मोठी दुखणी पाहिली की माझा हात फारच किरकोळ वाटत होता आणि पुन्हा एकदा स्वतःचं दुखणं विसरून मनाला जास्तीत जास्त सहनशील बनविण्याचा प्रयत्न होत होता.
सीमा शेख
५ जुलै २०१३
रात्री १२.००

No comments:
Post a Comment