या २९ जुलैला एक वर्ष होतंय या घटनेला. अजूनही आठवलं तरी त्या घटनेचे साक्षीदार असणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. त्या घटनेनंतरचे चार-पाच महिने तर मी विसरूच शकत नाही. पण हा सगळा असह्य काळ सुसह्य केला तो माझे ऑफिसमधले सहकारी, कुटुंबिय आणि डॉक्टर यांनी..
अक्षरशः पेनाचं वजनही ज्या बोटांना पेलवत नव्हतं, तीच बोटं आज हे सगळं लिहायला पुन्हा मदत करतायत. हातावरच्या `त्या` खुणाही आता दिसेनाशा झाल्यात. या वर्षीही दहावीचा निकाल लागला. म.टा. हेल्पलाइनसाठी गरजू मुलांचा शोध सुरू झाला. मी मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीसाठीही एक स्टोरी केली आणि स्टोरी प्रसिद्ध झाल्याच्या दिवशीच अचानक मन भूतकाळात गेलं. याच गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे चेक देण्याचा म.टा.चा जाहीर कार्यक्रम असलेला दिवस २९ जुलै २०१२. सकाळी अकराचा कार्यक्रम. आईला झालेली नागीण नुकतीच बरी होत आलेली. तिला पथ्य होतं. म्हणून कार्यक्रमाला निघण्यापूर्वी मी तिच्यासाठी वेगळा स्वयंपाक करून निघाले. गरवारे कॉलेजमधला कार्यक्रम संपवून आम्ही ऑफिसला येत होतो. मी, सुनील लांडगे आणि सचिन फुलसुंदर. साधारण दुपारी दोनची वेळ. कुठेतरी जेवायचा विचार होता. .............. या हॉटेलमध्ये जायचं असं त्या दोघांनी ठरवलं. ते दोघेही बाइकवर गप्पा मारत निवांत येत होते. मी माझ्या गाडीवर थोडं आधी पोहोचले आणि ठरलेल्या जगताप डेअरी चौकात त्यांची वाट पहावी, असा विचार केला. मागे दोघे दिसत नव्हते. म्हणून सचिनला फोन लावला. अर्थात त्याने मला थांबलेलं पाहिलं म्हणून माझा कॉल कट केला. इतक्यात गाडी स्टँडला लावावी, असा विचार करून मी गाडीवरून उतरण्याचा प्रयत्न केला पण संपलच.. सलवारचा काही भाग स्टँडमध्ये अडकला असेल, याची कल्पनाच नव्हती मला. गाडीचा स्टँड जागेवर लागल्यानंतरही सलवार अडकल्यामुळे मला पाय टेकवता आला नाही आणि मी पडताना पूर्ण वजन उजव्या मनगटावर टाकलं. पडताना समजत होतं.. वाटलं फक्त कमरेला, पाठीला मार बसेल..पण काही क्षणात माझ्या आवाजाचा जो काही भोंगा झाला नक्कीच १० लोक गोळा झाले. काही सेकंदातच सचिन आणि सुनील दोघंही माझ्याजवळ आले. काय झालं आणि कसं... हे कोणालाच समजलं नव्हतं. पडल्यानंतर मी थेट मांडी घालूनच बसले. उजवा हात उचलून घेईपर्यंत काही क्षणात तो प्रचंड सुजलेला दिसला आणि मुख्य म्हणजे त्याचा आकार विचित्र झाला होता. थोडासा वाकडाच. पाहिल्यावर फक्त एकच गोष्ट आठवली, आता आईचं काय होणार.. माझा हात नक्कीच फ्रॅक्चर आहे, हे समजत होतं. त्यामुळे तिच्यासाठीचा स्वयंपाक कोण करणार आणि ती कधी बरी होणार हा विचार मनात आला.
या दोघांनी मला उभं करण्याचा प्रयत्न केला. पण कोणाला हात लावू दिला तर शप्पथ.. अजूनही आठवतंय.. मी फक्त म्हणत होते.. मला डॉक्टरकडे घेऊन चला.. यापलिकडे काही सुचतंच नव्हतं. एखादं कोवळं रोपटं मुळासकट उपटल्यावर त्यालाही अशाच वेदना होत असतील, हे आता जाणवतंय. माझ्यादृष्टीने माझ्या हाताला नक्कीच काहीतरी मोठं झालं होतं. माझ्या गळ्यातला स्टोल काढून सचिनने माझ्या मानेभोवती गुंडाळला आणि अलगद माझा हात त्यात अडकवला. एका पावसाळ्यात झाड अंगावर पडून १६ फ्रॅक्चर झाल्यामुळे तो याबाबतीत माझ्यापेक्षा अनुभवी ठरला होता. आता थोडं बरं वाटू लागलं. माझं काही एक न ऐकता दोघांनी कसंतरी मला उचललं, एक रिक्षा थांबवली. आतापर्यंत प्रत्येक गोष्ट दोघंही इतक्या समंजसपणे करीत होते, पण पुढच्या एका वाक्याने त्यांनी मला चिडायला लावलं. दोघांनीही मला विचारलं, कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं.. हा प्रश्न विचारल्याचाच मुळात मला त्या क्षणीही राग आला. आम्ही काय कॉफी प्यायला जाणार नव्हतो की फिल्म बघायला... की मला ऑप्शन विचारावा.. मला तातडीने कोणत्यातरी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती, जेणेकरून एखादा ऑर्थोपेडिक डॉक्टर मिळू शकेल... आणि हे दोघे माझे मित्र निरामय, लोकमान्य की आदित्य बिर्ला.. असे ऑप्शन्स मला देत होते. अखेर मी कळवळून म्हटलं, प्लीज मला विचारू नका.. कुठेही न्या, पण पटकन न्या.. मला डॉक्टरची गरज आहे. अखेर सचिन त्याच्या बाइकवर.. माझी गाडी चौकातच लावलेली आणि सुनील माझ्याबरोबर रिक्षामध्ये अशी यात्रा निघाली.
जगताप डेअरीपासून वाकडच्या चौकापर्यंत मला काहीच समजत नव्हतं. मी डोळे मिटले होते. हा चौक क्रॉस केला आणि प्रचंड वेदना सुरू झाल्या. तेव्हा कळलं की इथे बीआरटीच्या रस्त्याचं काम सुरू होतं. महापालिकेच्या या रेंगाळणाऱ्या आणि रखडणाऱ्या कामांची जाणीव पहिल्यांदा झाली. खड्ड्यांचे खूप हादरे बसत होते. मी क्षणात सांगितलं, बिर्लापर्यंत मी नाही येऊ शकत. इतक्यात सुनीलला रस्त्याच्या उजव्या बाजूला फिनिक्स हॉस्पिटलचा बोर्ड दिसला. त्याचा पुन्हा मला प्रश्न.. सीमा, फिनिक्स हॉस्पिटल. बाहेरून तरी चांगलं वाटतंय. जाऊया का... नंतर पाहू काय करायचं.. माझ्याकडे ऑप्शन नव्हता. मी फक्त मान हलवली. आमची अत्यंतिक रिक्षाची निकड पाहून रिक्षावाल्यानेही कापलं. नक्कीच गरजेपेक्षा जास्त पैसे घेतले. कधी नव्हे ते मला खूप लोक मदत करत होते.
अॅक्सिडेंट केस म्हटल्यावर हॉस्पिटलचा स्टाफ मदतीला आला. व्हीलचेअर हवी का विचारलं.. पण व्हीलचेअर म्हणजे जरा जास्तच काहीतरी झालंय असं वाटतं.. म्हणून मी सरळ नकार दिला. पहिला अर्धातास तर डॉक्टर शोधण्यात गेला. रविवारचा दिवस असल्यामुळे त्याक्षणी कोणीच नव्हतं. त्यातल्या त्यात एक ज्युनिअर डॉक्टर आला. एक्स-रे काढू म्हणाला. त्यासाठी कित्येक वेळ खर्च झाला. कणभरही न हलणाऱ्या आणि प्रचंड ठणकणाऱ्या हाताला हलविण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत होती. एकीकडे फोनवरून कोणतरी डॉक्टर त्यांना सूचना देत होते. एकीकडे प्रचंड भूक लागली होती. अखेर थोड्याच वेळात डॉक्टर येऊन काय करायचं ते सांगतील, यांना रूममध्ये घेऊन जा.. असं सांगितल्यावर आमची यात्रा पुन्हा निघाली. सचिनचा पुन्हा प्रश्न, सीमा मॅडम, डीलक्स रूम घेऊया का.. साधी नको ना.. त्यावर सुनीलचा कोट, तो म्हणाला, हो.. ही अॅडमिट झाली म्हणजे भेटायला लोक येणार आणि मग इतरांना डिस्टर्बन्स नको.. माझी अवस्था काय.. आणि या दोघांची चर्चा काय... आता आठवलं की हसू येतं.. हे सगळं दिव्य पार पडेपर्यंत आमचे आणखी दोन सहकारी बापू ओव्हाळ, राजेश माने आणि लीना माने यांना फोन गेले होते. आणि लीनाला ही बातमी समजली म्हणजे पूर्ण पिंपरी-चिंचवडच्या पत्रकारांपर्यंत निरोप पोहोचला होता.
आता खरी वेळ होती, ती माझ्या घरी कळविण्याची. दरम्यान, मला रूममध्ये पोचविल्यावर सुनील आणि सचिनने माझी गाडी आणली. एव्हाना बापू आणि लीना पोहोचले. ही सुरवात होती अॅक्सिडेंटची कथा ऐकविण्याची. तिला सांगेपर्यंत नर्स, आणखी एक-दोन ज्युनिअर डॉक्टर आले. कसं पडलात, कुठे लागलं.. आस्थेनं आणि अभ्यासू नजरेनं माझं निरीक्षण करत होते. मी शेवटचं कधी आणि काय खाल्लंय याची चौकशी करत होते. माझा हात हा या सगळ्यांनाच अभ्यासाचा विषय झाला होता. मधूनच कोणीतरी मनगटाला आधार देत हात बांधला. मी मांडीवर उशी घेऊन, त्यावर हात अलगद ठेवून आरामात बसले होते. आपल्यात प्रचंड सहनशक्ती आहे, हे समजू लागलं होतं. ह़ॉस्पिटलमधले अनेक जण येऊन गेले पण खऱ्या डॉक्टरचा पत्ताच लागत नव्हता. प्रत्येकाला तीच ती कथा सांगून मला कंटाळा आला. डॉक्टर येतायत असं खूप वेळा सांगून माझ्या पेशन्सचा अंत पहात होते. प्रचंड भूक आणि तहान लागलेली. इतक्यात एकाने येऊन सांगितलं, डॉक्टर आलेत. एक्स-रे बघतायत. आता यांना खायला तर काहीच नाही पण पाण्याचा थेंबही देऊ नका. आता प्रचंड अस्वस्थ वाटत होतं.
अखेर बऱ्याच वेळाने चष्मा घातलेली एक मध्यम उंचीची व्यक्ती आत आली. त्यांच्याबरोबर आणखी काही स्टाफ. त्यांनी माझा बांधलेला हात अलगद सोडला. पुन्हा एकदा अॅक्सिडेंटच्या कथेची टेप मला यांच्यापुढे वाजवाली लागली पण पर्याय नव्हता. हेच बहुतेक खरे डॉक्टर असावेत, अशी खात्री पटली. (खरे म्हणजे, मला जे ट्रीटमेंट देणार होते ते..) माझं सगळं ऐकून घेतल्यावर त्यांनी बोलायला सुरवात केली. माझ्या हाता काय झालंय ते सायंटिफिक आणि मेडिकलच्या भाषेत सांगितलं. मी हं हं असं म्हणत सगळं ऐकून घेतलं. पण बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आता ऑपरेशन करावं लागणार, एवढंच मी समजून घेतलं.
अखेर आई-बाबा आल्यावर रात्री आठ वाजता ऑपरेशन करायचं हे नक्की झालं.
सीमा शेख
गुरूवार, २७ जून २०१३
दु. ३.००

2 comments:
खूपच छान लिहीता तुम्ही ...सगळा प्रसंग समोर उभा राहतो.... लिखाणाची शैली अप्रतिम आहे
Thanks Amruta...
Post a Comment