कुणीतरी मागून जोरात हाक मारली.. अहो मुलीला उचलून घ्या गाडी प्लॅटफॉर्मला लागतेय.. इतक्यात मला कोणीतरी झटकन कडेवर उचलून घेतलं आणि एव्हाना गाडी खरंच प्लॅटफॉर्मला लागली होती. त्या माणसानं मला आई-बाबांच्या पुढ्यात ठेवलं आणि तो गर्दीत दिसेनासा झाला. खूप प्रयत्न केला त्याला शोधण्याचा, त्याला थँक्स म्हणण्यासाठी. पण तो कोणालाच सापडला नाही. कोण होता कोण जाणे.. पण मला मात्र पुनर्जन्म देऊन गेला.. त्या दिवशी त्या क्षणी त्यानं मला उचलून घेतलं नसतं, तर कदाचित हे सगळं दुसरं कोणी तरी कथन करत असतं.....
ट्रेन किंवा लोकलचा प्रवास माझा खूप आवडता. मलाच काय कोणालाही हा प्रवास जास्त आवडतो. गार वाऱ्याचा आनंद घेत निसर्गाच्या सान्निध्यातून ट्रेनमधला प्रवास अनुभवणं.. याची मजा औरच असते. पण अजूनही लोकलच्या प्रवासामुळे धोडीशी धडकीच भरते. आजही आठवतो तो पावसाळ्यातला दिवस. साधारणपणे १९९१-९२ ची गोष्ट असेल. पावसाळ्याचे दिवस होते. त्या वेळी पावसाळा म्हणजे लोणावळा आणि भुशी डॅमची ट्रिप ठरलेली असायची. घरातल्या सगळ्या लहान मुलांनाही अशी ट्रीप घडवावी म्हणून आई-बाबा आम्हाला घेऊन निघाले. लोकलच्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आम्ही लोकलने निघालो. बाबा मला घेऊन लोकलच्या दारात पाय सोडून बसले. ट्रॅक कसा बदलतो, मार्गात कोणती स्टेशन्स येतात अशा अनेक गोष्टी दाखवत, माहिती सांगत आमचा प्रवास मजेत सुरू होता.
इतक्यात कोणीतरी हाक मारली म्हणून मला तिथेच बसायला सांगून ते उठून गेले. लोणावळा स्टेशन आलं की हाक मारतो, असं सांगितलं. काही वेळाने त्यांनी हाक मारली सुद्धा.. पण मीच ती ऐकली नाही. लोणावळा हे लोकलचं शेवटचं स्टेशन असल्यामुळे प्लॅटफॉर्म उजव्या किंवा डाव्या कोणत्याही बाजूला येऊ शकतो, हे त्या वेळी मला थोडीच माहीत होतं. उतरण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. इतक्यात खिडकीतून कोणीतरी ओरडलं.. गाडी प्लॅटफॉर्म लागतेय त्या मुलीला पहिलं उचला... काही तरी गडबड झाली, आसपासच्या लोकांचा गोंधळ सुरू झाला एवढंच मला समजलं. आणि अचानक त्यांच्यापैकीच कोणीतरी मला घाईघाईने उचलून घेतलं आणि तो झरकन आत शिरला. मी एव्हाना रडायला सुरवात केली होती. एकीकडे मी दिसत नाही म्हणून आई-बाबा माझा शोध घेत होते.. आणि तेवढ्यात त्या माणसानं ही कोणाची मुलगी आहे म्हणून मला उंचावून डब्यात दाखवलं आणि बाबांच्या स्वाधीन केलं. फक्त सहा-सात वर्षांचा माझा जीव. जर त्यानं वेळेवर नसतं उचलून घेतलं तर माझं काय झालं असतं, याची आता कल्पनाही करवत नाही. तो क्षण आठवला तरी अंगावर शहारा येतो. काही क्षण मन सुन्न होतं.. निःशब्द आणि अचल होऊन जातं.. त्या माणसाची खूप आठवण येते. फक्त एवढंच समजतं, की तो दिवस म्हणजे पुनर्जन्म होता.. दुसरं काही नाही...
सोमवार, १८ मार्च २०१३
सीमा शेख

No comments:
Post a Comment